मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी मविआ सरकारकडून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. (Governor Koshyari left without speaking) तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात ठराव आणणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विधान भवनाच्या पायरीवरच आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात पोहचले आहेत. तर राज्यपाल अभिभाषण वेळी सत्ताधारी पक्षाची लोक गोंधळ घालत होती. सत्ताधारी पक्षाची ही जबादारी होती की, सभागृहाचे वातावरण चांगले ठेवणे. यातही ठाकरे सरकार फेल ठरले असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
State Budget Session : “…विषयांवर भाजप वाटमारीफेम ठाकरे सरकारचे वस्त्रहरण करणार”, भातखळकरांचा इशारा
IPL 2022: कारण नसताना IPLला नाव ठेवणाऱ्या माजी खेळाडूंना अश्विनने फटकारले
“सरकार चांगलं काम करतंय म्हणून अनेकांना अस्वस्थता”, शरद पवारांचा भाजपवर निशाणा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी किरीट सोमय्या दिल्ली दरबारी; चर्चांना उधाण
“… आणि आम्ही ४ तास गप्पा मारल्या” विराट कोहलीसोबत भेटीच्या आठवणींचा जेमिमाहने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

