Share

IPL 2022: दीपक चहरच्या एक्झिटने ‘चिन्ना थाला’ चेन्नईमध्ये परतणार?

Published On: 

मुंबई: दीपक चहर आयपीएल २०२२च्या या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. ज्यानंतर आता सुरेश रैनाचे नाव सध्या सतत चर्चेत आले आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा त्याच्या पुनरागमनाची अटकळ सुरू आहे. या वर्षी मेगा ऑक्शनमध्ये २ कोटींच्या मूळ किमतीसह उतरलेल्या रैनामध्ये कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही. त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्सनेही त्याला आपल्यात सामील केले नाही. पण, आता सुरेश रैनाबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.

दीपक चहर (deepak chahar) IPL 2022 हंगामातून बाहेर पडल्यानंतर, रैना (suresh raina) त्याच्या जागी CSKमध्ये प्रवेश करू शकतो. वृतांनुसार चेन्नईची रैनासोबत याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. गेल्या वर्षी चेन्नईचा भाग असलेल्या रैनाला यंदाच्या मोसमात खरेदीदार मिळाला नव्हता. ज्यानंतर रैनाने आयपीएलमध्ये कमेंटेटर म्हणून नवीन भुमीका बजावणे सुरु केले आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार CSK सुरेश रैनाला पुन्हा त्यांच्यासोबत जोडू शकते. याचे एक कारण हे देखील आहे की अंबाती रायडूची या मोसमातील कामगिरी पूर्वीपेक्षा खूपच खराब झाली आहे. रायुडूने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात केवळ ८२ धावा केल्या आहेत. चेन्नईने आतापर्यंत ५ सामन्यांपैकी फक्त १ सामना जिंकला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता ‘चिन्ना थाला’ची पुन्हा आयपीएलमध्ये एंट्री होऊ शकते.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!