मुंबई : आयपीएल २०२२(IPL 2022) चा ५८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्स सामन्यात आर अश्विन आणि देवदत्त पडिक्कल यांच्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. याच निर्णयामुळे सुनील गावसकरांनी सॅमसनला फटकारले आहे . गावस्कर म्हणाले की, सॅमसनने आपल्या संघासाठी महत्त्वाच्या सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन जबाबदारी घ्यायला हवी होती.
संजू सॅमसनने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आणि देवदत्त पडिक्कलला चौथ्या क्रमांकावर स्वतःहून पुढे पाठवले. सॅमसन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो खेळपट्टीवर फक्त चार चेंडू टिकला आणि त्याला एनरिक नॉर्कियाने फक्त ६ धावांवर बाद केले. त्यानंतर राजस्थानने २० षटकांत ६ बाद १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने ८ गडी आणि ११ चेंडू राखून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. दिल्लीकडून मिचेल मार्शने ८९ धावांची खेळी खेळली. तर डेव्हिड वॉर्नर ५२ धावांवर नाबाद राहिला. या दोघांच्या १४४ धावांच्या सनसनाटी भागीदारीमुळे सामन्यात दिल्लीने बाजी मारली.
That's how one happy camp looks like, isn't it @DelhiCapitals… ????
How many ???????? for that #Epic win in #RRvDC?#TATAIPL #IPL2022 #YehHaiNayiDilli #DelhiCapitals pic.twitter.com/Co9hzhsjSZ
— Star Sports (@StarSportsIndia) May 11, 2022
पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा संजू सॅमसनचा निर्णय सुनील गावस्करांच्या पचनी पडला नाही. सुनील गावसकर म्हणाले की, संजू सॅमसनला त्याच्या डावाच्या सुरुवातीपासूनच मोठे फटके मारावे लागले आणि त्याच प्रयत्नात तो बाद झाला. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याऐवजी राजस्थानसाठी महत्त्वाच्या सामन्यात ३ किंवा ४ क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे होते.
“जर तुमचा फलंदाजीचा क्रमांक ४ असेल तर तुम्ही ४ किंवा ३ क्रमांकावर फलंदाजीला आलात तरी काही हरकत नाही. पण महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यांमध्ये म्होरक्या बनून जबाबदारी घेणे गरजेचे आहे, असे गावस्कर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

