Share

IPL 2022 : ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! शाहरुख खाननं विकत घेतली अजून एक क्रिकेट टीम; वाचा!

Published On: 

मुंबई : नाइट रायडर्स ग्रुपने (Knight Riders Group) आपला आणखी एक संघ एका टी-२० लीगमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. हा ग्रुप बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या (SRK) मालकीचा आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघ आहे. याशिवाय वेस्ट इंडिजमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स या नावाने होणाऱ्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये हा संघ सहभागी होतो. त्याचवेळी, अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमधील फ्रेंचायझीचे नाव लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आहे. दरम्यान, यूएईमध्ये टी-२० लीग सुरू होणार आहे. यामध्ये या ग्रुपने अबुधाबी नाइट रायडर्स नावाचा संघ मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुही चावला आणि तिचे पती जय मेहता यांचीही या ग्रुपमध्ये हिस्सेदारी आहे.

शाहरुख खान म्हणाला, “अनेक वर्षांपासून आम्ही नाइट रायडर्स ब्रँडचा जागतिक स्तरावर विस्तार करत आहोत आणि यूएईमध्ये टी-२० क्रिकेटच्या शक्यतांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. यूएई टी-२० लीगचा भाग होण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत, जे नक्कीच यशस्वी होईल. त्याच वेळी, लीगचे अध्यक्ष खालिद अल जरूर म्हणाले, की नाइट रायडर्स ग्रुप टी-२० क्रिकेट विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांचा संघ जगभरातील लीगमध्ये उतरत आहे. अशा परिस्थितीत, आमच्याबरोबर ग्रुपमध्ये सामील होणे खूप खास आहे.

आयपीएलमध्ये केकेआर संघाने दोन वेळा लीगचे विजेतेपद पटकावले आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले होते. याशिवाय कॅरेबियन प्रीमियर लीगमधील संघाचा विक्रम आणखी सरस आहे. संघाने तेथे चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. तो त्या लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ देखील आहे. या संघाने २०१५, २०१७, २०१८ आणि २०२०मध्ये विजेतेपद पटकावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!