Share

IPL 2022 CSK vs MI : रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘बर्थडे बॉय’ पोलार्डला डच्चू देत मुंबईनं उतरवला ‘नवा’ खेळाडू!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होत आहे. लीगच्या ५९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे संघ आमनेसामने आले आहेत. वानखेडे मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहितने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून ट्रिस्टन स्टब्सने पदार्पण केले आहे, तर ‘बर्थडे बॉय’ कायरन पोलार्ड सामन्याबाहेर आहे. चेन्नई आणि मुंबई यांच्यात नेहमीच जोरदार टक्कर राहिली आहे. मात्र, यंदाच्या आयपीएल हंगामात दोन्ही संघांची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जही हंगामातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत ही दोन्ही संघांच्या सन्मानाची लढत आहे.

दोन्ही संघांमध्ये एकूण नऊ आयपीएल ट्रॉफी आहेत. चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आणि मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्स संघ हेड टू हेड रेकॉर्डमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या पुढे आहे. त्यांनी १९ तर ​​सीएसकेने १४ सामने जिंकले आहेत. महेंद्रसिंह धोनी हा मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक सामने (३८) खेळणारा खेळाडू आहे, धोनीने या सामन्यांच्या ३३ डावांमध्ये ३३.८०च्या सरासरीने ७१० धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने या संघाविरुद्ध खेळलेल्या ३० सामन्यांमध्ये २७.८५च्या सरासरीने ७५२ धावा केल्या आहेत. रोहितने चेन्नईविरुद्ध सात अर्धशतके झळकावली आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कप्तान/यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, महेश थिक्षना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!