Share

IPL 2022 : आत्ता समजलं..! जडेजाला Unfollow केल्याच्या प्रश्नावर CSKचे सीईओ म्हणाले…

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि फ्रेंचायझीसंबंधीत एक बातमी समोर आली. सीएसकेने जडेजाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चा रंगली. आता याबाबत सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

अनफॉलो करण्याच्या प्रश्नावर काशी विश्वनाथन म्हणाले, “मला इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या गोष्टींबद्दल काहीही माहिती नाही आणि मी तुम्हाला याबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. मी तुम्हाला सांगू शकतो की संघ व्यवस्थापनाच्या बाजूने कोणतीही अडचण नाही. चेन्नई संघाच्या भविष्यातील नियोजनात जडेजा नेहमीच असेल.”

जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नईने पहिल्या आठ सामन्यांमध्ये फक्त दोनच सामने जिंकले आणि सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. धोनी पुन्हा कर्णधार झाल्यावर संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. कर्णधारपद मिळाल्यानंतर धोनीने ज्या प्रकारचे वक्तव्य केले त्यावरून जडेजासोबत संघात सर्व काही ठीक नाही हे स्पष्ट झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!