मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाज विराट कोहली खराब फॉर्मात खेळत आहे. त्याच्या या फॉर्मवर पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रिझवान म्हणाला, ”विराट कोहली लवकरात लवकर फॉर्ममध्ये येण्यासाठी मी प्रार्थना करू शकतो, कारण तो खूप मेहनती क्रिकेटर आहे.”
आयपीएल २०२२ विराट कोहलीसाठी काही खास राहिले नाही. त्याला फार मोठी खेळी खेळता आली नाही आणि त्याचा स्ट्राईक रेटही खराब राहिला आहे. कोहलीने आरसीबीसाठी या मोसमात १९.६४च्या सरासरीने आणि २१६ धावा केल्या आहेत. तीन सामन्यांत तो शून्यावरही बाद झाला. कोहली एकाच मोसमात एका संघाविरुद्ध दोनदा गोल्डन डकवर बाद झाला.
मोहम्मद रिझवान म्हणाला, ”मी म्हणेन की विराट कोहली हा चॅम्पियन खेळाडू आहे. पण या टप्प्यावर आपण त्याच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो, कारण तो खूप मेहनती क्रिकेटपटू आहे. कठीण वेळ येते आणि गोष्टी सोप्याही असतात. प्रत्येक खेळाडू शतक झळकावतो आणि शून्यावर बाद होतो. हे सर्व चालू राहते. मी त्याच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो आणि आशा करतो, की तो कठोर परिश्रमाने फॉर्ममध्ये परत येईल.”
"Things do get easier" ????
Mohammad Rizwan is confident that Virat Kohli will get through the tough times ????#Rizwan #ViratKohli #PAKvIND #IPL2022 pic.twitter.com/RynNorEKiH
— CricWick (@CricWick) May 10, 2022
विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत अनेक दिग्गज त्याला अनेक प्रकारचे सल्ले देत आहेत. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांना आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. त्याचवेळी निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही विराट कोहलीला विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

