Share

“मला वाटायचं की तो..”, पाकिस्तानच्या शोएब अख्तरनं ‘अशा’ शब्दांत केलं बुमराहचं कौतुक; वाचाल तर वाटेल अभिमान!

Published On: 

मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बुमराह आयपीएलमधूनच पुढे आला आणि कमी कौशल्य असूनही त्याने जबरदस्त कामगिरी केल्याचे त्याने म्हटले आहे. ”आधी मला वाटायचे की बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये चांगला गोलंदाज नाही पण तो कसोटीतही कामगिरी करतो”, असे अख्तरने सांगितले.

आयपीएल २०२२ मध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर असतील, ज्याने गेल्या सामन्यात ५ बळी घेत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. बुमराह सतत फ्लॉप होत होता पण केकेआर विरुद्धच्या सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. बुमराहने ४ षटकात एका मेडनसह १० धावांत ५ बळी घेतले. बुमराहने टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात पाच विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अख्तर म्हणाला, “मोठा वेगवान गोलंदाज मोठा आहे. बुमराह एक जबरदस्त प्रतिभा आहे आणि त्याची अ‍ॅक्शन शानदार आहे. त्याच्याकडे तेवढे कौशल्य नव्हते, पण तरीही तो भारतासाठी चांगला खेळला. त्याला जे नाव मिळाले ते आयपीएलमुळे. आणि तिथून तो पुढे गेला. मला वाटायचे, की तो चांगला कसोटी वेगवान गोलंदाज नाही. लोक तेच म्हणायचे. मी म्हणालो त्याला आधी गोलंदाजी करू द्या आणि मग बघू काय होते. त्याने एकदिवसीय आणि टी-२० आणि कसोटीतही जबरदस्त गोलंदाजी केली. पुनरागमन हा खेळाडूच करू शकतो ज्याचे मन मोठे आहे. बुमराहमध्ये तेवढे धैर्य आणि ताकद आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!