🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपतीचे राजकारण केले असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर कालच्या (१ मे) औरंगाबाद येथे झालेल्या सभेतही त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. त्यात भाजपही सतत राष्ट्रवादीला टार्गेट करत असते. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करत शरद पवारांना (sharad pawar) टोला लगावला आहे.
“देवेंद्र फडणवीस साहेब असू दे किंवा राजसाहेब ठाकरे असू दे सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आलाय. मी अजून पर्यंत एकही माणूस पवार साहेबांबद्दल खाजगी मध्ये चांगलं बोलताना बघितला नाही. आता तर लोकं उघड बोलू लागले.”, असा टोला निलेश राणे यांनी ट्वीट करत लगावला.
स. देवेंद्र फडणवीस साहेब असू दे किंवा स. राजसाहेब ठाकरे असू दे सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आलाय. मी अजून पर्यंत एकही माणूस पवार साहेबांबद्दल खाजगी मध्ये चांगलं बोलताना बघितला नाही. आता तर लोकं उघड बोलू लागले.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 2, 2022
दरम्यान कालच्या सभेत राज ठाकरे यांनी म्हटले की, “शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत, हे मी सांगितल्यानंतर सगळे बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी ‘जात’ मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही.”
महत्वाच्या बातम्या:
- “…विचित्राबाई जिथे भ्रष्टाचार तिथे तुम्ही”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर शिवसेनेचे प्रत्युत्तर!
- “…त्यामुळे राज ठाकरे केवळ शरद पवारांवर बोलतात”, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
- “…जाहीर करून फडणवीसांनी विरोधकांची झोप उडवलेली आहे”, अतुल भातखळकरांचा टोला
- “…त्यांच्या भाषणात मला काहीच दम वाटला नाही”, जयंत पाटील यांची टीका
- “हिंदु-मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या महाराष्ट्राला…”, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
