औरंगाबाद: महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल (१ मी ) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मशिदिंवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मशिदींवरील भोंग्यांचा विषय हा नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी तो मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय सुचवला आहे. ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर लावले जातील, त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. भोंग्यांचा विषय हा सामाजिक आहे, धार्मिक नाही. त्याला कुणी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही धर्माचा आधार घेता येतो. असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जातात, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल करत राज ठाकरेंनी मविआ सरकारवरही निशाणा साधला. सर्वांना समान धर्म असावा, मग प्रत्येकवेळी आम्हीच का भोगावे? ३ मे रोजी ईद आहे. त्यांच्या सणात मला विष कालवायचे नाही, पण ४ तारखेपासून अजिबात ऐकणार नाही. असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “एकही माणूस पवार साहेबांबद्दल खाजगी मध्ये चांगलं बोलताना…”, निलेश राणेंचा टोला
- “…विचित्राबाई जिथे भ्रष्टाचार तिथे तुम्ही”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर शिवसेनेचे प्रत्युत्तर!
- “…त्यामुळे राज ठाकरे केवळ शरद पवारांवर बोलतात”, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
- “…जाहीर करून फडणवीसांनी विरोधकांची झोप उडवलेली आहे”, अतुल भातखळकरांचा टोला
- “…त्यांच्या भाषणात मला काहीच दम वाटला नाही”, जयंत पाटील यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

