🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आयपीएलच्या १५ व्या आवृत्तीत कोणत्याही संघाचा भाग नाहीये. इशांतने आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये १.५० कोटींसह आपले नाव नोंदवले होते. मात्र, एकाही फ्रँचायझीने त्याच्यात रस दाखवला नाही. त्यामुळे तो ऑक्शन मध्ये विकला गेला नाही. त्याचवेळी त्याला भारतीय कसोटी संघातूनही वगळण्यात आले होते. अशा परिस्थितीत इशांत यावेळी आयपीएलमध्ये मैदानात कोणत्याही संघासोबत नसून एका वेगळ्या भूमिकेत दिसला आहे.
RCB आणि KKR यांच्यातील सामन्यादरम्यान, व्हर्च्युअल गेस्ट बॉक्स मोठ्या स्क्रीनवर दाखवला जात होता. ज्यामध्ये आयपीएल प्रायोजकांचे काही पाहुणे दिसत होते. दरम्यान, चाहत्यांच्या नजरा रुपेच्या आभासी पाहुण्याकडे गेल्या, जो दुसरा कोणी नसून इशांत शर्मा (ishant sharma) होता. ज्याला आयपीएलचा चांगला अनुभव आहे, मात्र त्याला यावर्षी कोणीही विकत घेतले नव्हते. आता त्याचा हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यासह, इशांतला मैदानाबाहेर पाहून प्रेक्षकांना अजिबात आनंद झाला नाही. उलट ते इशांतला अशा स्थितीत बघून निराश झाले आहेत.
इशांत २००८ पासून आयपीएलचा भाग आहे. हा पहिलाच सीझन आहे ज्यामध्ये इशांत कोणत्याही फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करताना दिसत नाही. त्याला २०१९च्या ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले होते. त्यामुळे तो DCकडून सलग ३ सीझन खेळताना दिसला. मात्र यावेळी तो अनसोल्ड राहिला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा,म्हणाला..
- “मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट” – अजित पवार
- IPL 2022 : अरेरे…काय हे! RCBचा कप्तान फाफ डु प्लेसिसने घेतला सर्वात वाईट रिव्ह्यू; पाहा VIDEO
- VIDEO: अन एकाच क्रीज वर दोन्ही खेळाडू तरी कोणीही झाला नाही रन आऊट; बघा IPL 2022 मधील मजेशीर घटना
- “मी बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे..” समंथा रुथ प्रभू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
