🕒 1 min read
मुंबई : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा विचार करत आहे. खरेतर, गेल्या दोन देशांतर्गत हंगामापासून, दिल्लीचा वरिष्ठ संघ अत्यंत निराशाजनक कामगिरी करत आहे, दिल्लीच्या संघाची रणजी ट्रॉफीमध्येही अत्यंत खराब कामगिरी झाली होती.
झारखंडकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, संघ त्यांच्या गटात तळाला होता आणि बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. त्यानंतर राजकुमार यांना पदावरून हटवले जाईल असे मानले जात होते. पीटीआयशी बोलताना डीडीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की डीडीसीए संपूर्ण कोचिंग रचनेत सुधारणा करेल आणि त्यामुळे पुढील हंगामात राजकुमार यांचा करार पुढे वाढवला जाणार नाही.
राजकुमार यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ गेल्या वर्षी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. संघाची कामगिरी आणखी खालावली आणि यंदा संघाची अवस्था आणखीनच बिकट झाली. दिल्लीच्या संघाला सर्व स्पर्धांमध्ये ग्रुप स्टेजच्या पुढेही प्रगती करता आली नाही. राजकुमार यांच्या प्रशिक्षकपदावर असताना प्लेइंग इलेव्हनवरही प्रश्न उपस्थित झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : अरेरे…काय हे! RCBचा कप्तान फाफ डु प्लेसिसने घेतला सर्वात वाईट रिव्ह्यू; पाहा VIDEO
- VIDEO: अन एकाच क्रीज वर दोन्ही खेळाडू तरी कोणीही झाला नाही रन आऊट; बघा IPL 2022 मधील मजेशीर घटना
- “मी बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे..” समंथा रुथ प्रभू
- राहुल गांधींनी बाईकला हार घालत केला इंधन दरवाढीचा निषेध; दिल्लीत काँग्रेसची निदर्शने
- IPL 2022: कमी धावसंख्या असूनही पराभवानंतर श्रेयसने सांगितले कारण; म्हणाला ‘व्यंकटेशला बॉलिंग…’
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
