मुंबई : भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने अजिंक्य रहाणेबाबत मोठा खुलासा करताना त्याचे कौतुक केले आहे. रहाणे ज्या काळात दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळत असे त्या काळाबद्दल बोलताना कैफने रहाणेचे वर्णन एक टीम मॅन आणि मोठा खेळाडू म्हणून केले आहे. यावेळी अजिंक्य रहाणे केकेआरकडून खेळत आहे.
२०१९ ते २०२१ या कालावधीत दिल्ली फ्रेंचायझीसोबत काम करताना कैफला भारताच्या माजी कसोटी उपकर्णधारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. रहाणे २०२० आणि २०२१च्या हंगामात संघासोबत होता. मात्र, त्याला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. २०२०मध्ये त्याने नऊ सामने खेळले होते. पुढील वर्षी २०२१मध्येही रहाणेने काही सामन्यांमध्ये भाग घेतला.
कैफ म्हणाला, ”रहाणेबद्दल मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे तो (दिल्ली कॅपिटल्स) संघाचे वातावरण खराब करू इच्छित नाही, जरी संधी न मिळाल्याने तो वैयक्तिकरित्या थोडा निराश झाला होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्याने ते स्वतःकडेच ठेवले आणि संघासाठी काय सर्वोत्तम आहे हे कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला माहीत आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला. त्याला कोणाच्याही मनात शंका ठेवायची नव्हती. सकाळी उठण्यापासून ते जिमला जाण्यापर्यंत रहाणे योग्य गोष्टी करतो. तो संघटित खेळाडू आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
- विराट कोहलीचे बालपणीचे कोच संकटात; दिल्ली क्रिकेट असोसिएशन ‘असं’ पाऊल उचलण्याच्या तयारीत!
- आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा, म्हणाला..
- “मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट” – अजित पवार
- IPL 2022 : अरेरे…काय हे! RCBचा कप्तान फाफ डु प्लेसिसने घेतला सर्वात वाईट रिव्ह्यू; पाहा VIDEO
- VIDEO: अन एकाच क्रीज वर दोन्ही खेळाडू तरी कोणीही झाला नाही रन आऊट; बघा IPL 2022 मधील मजेशीर घटना
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


