Share

CSK vs KKR : कोण जिंकणार IPL 2022चा पहिला सामना? दोघांपैकी ‘हा’ संघ आहे बलाढ्य!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२चे बिगुल आजपासून वाजणार आहे आणि या स्पर्धेचा पहिला सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यात चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ आणि दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ आमनेसामने येणार आहेत. यावेळी दोन्ही संघात बरेच बदल झाले असून सर्वात मोठा बदल कर्णधारपदाचा आहे. एकीकडे सीएसकेची कमान रवींद्र जडेजा सांभाळणार आहे, तर केकेआरची कमान श्रेयस अय्यरकडे आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ पहिल्या सामन्यापासून अनेक गोष्टींना मुकणार आहे. महेंद्रसिंह धोनी यापुढे कर्णधार राहणार नाही, हा सर्वात मोठा धक्का आहे. याशिवाय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहर हा देखील दुखापतीमुळे उपलब्ध नाही, तर मोईन अली उशिरा व्हिसा मिळाल्यामुळे क्वारंटाइन कालावधी पूर्ण करू शकला नाही आणि तो देखील या सामन्यात सहभागी होणार नाही.

दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सलाही आपल्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भासणार आहे. संघाचा स्ट्राइक वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आपल्या देशाकडून खेळण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे, आरोन फिंचदेखील सुरुवातीच्या सामन्यांचा भाग असणार नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज टीम साऊदीही पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. अशा स्थितीत नवा कर्णधार श्रेयस अय्यरसमोर अनेक आव्हाने आहेत.

हेड-टू-हेड आकडेवारी

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत २६ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज १७-८ अशा फरकाने आघाडीवर आहे आणि एक सामना रद्द झाला आहे. अशा स्थितीत सीएसकेचे पारडे जड दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!