Share

IPL 2022 : CSKने दिले नाईट रायडर्सना १३२ धावांचे लक्ष्य ; विंटेज ‘धोनी’ परतला!

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२ चा थरार स्टाईलने सुरू झाला आहे. नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. २ धावांवर ऋतुराज गायकवाडची विकेट पडल्यानंतर चेन्नईची खेळी ढासळताना दिसली. मात्र जडेजा सोबत फलंदाजीस उतरलेल्या धोनीने संघाला १३१ पर्यंत नेण्यास मदत केली आणि चाहत्यांना ‘विंटेज धोनी’ देखील दिसला.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज (csk) प्रथम फलंदाजी करण्यासाठी डेव्हॉन कॉनवे ऋतुराज गायकवाडसह मैदानात उतरला होता. मात्र चेन्नईचे सलामीवीर लवकर माघारी परतले. माध्यमफळीला उथप्पा आणि रायडूने धावा करायचे प्रयत्न केले मात्र तेही माघारी परतले. यानंतर नाव कर्णधार जडेजा (ravindra jadeja) आणि माजी कर्णधार धोनी (MS Dhoni) या दोघांनी मिळून चेन्नईचा खेळ सांभाळला. यात विशेष म्हणजे प्रॅक्टिसमध्ये दिसलेला फॉर्म माहीने सामन्यातही दाखवला. ३८ चेंडूत धोनीने धमाकेदार नाबाद अर्धशतक झळकवले.

धोनीने झळकवलेल्या अर्धशतकात ७ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. त्याची फटकेबाजी बघून चाहतेही सुखावले आहेत. तसेच कोलकाता संघाकडून संघाकडून उमेश यादवने ३ विकेट्स पटकावल्या. कोलकता संघ १३२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!