Share

IPL 2022 : कोलकात्याच्या खेळाडूने दाखवला श्रेयसवर विश्वास; म्हणाला “तो ट्रॉफी जिंकवेल”

Published On: 

मुंबई: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव पुन्हा एकदा आयपीएलमध्ये त्याच्या माजी फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. कोलकाताने उमेशला आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये २ कोटी रुपयांना विकत घेतले. अशा परिस्थितीत आता उमेश यादवने केकेआरचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरबद्दल बरेच काही सांगितले आहे. यावेळी श्रेयस केकेआरला आयपीएलचे जेतेपद मिळवून देईल, असा विश्वास यादवने दर्शवला आहे.

मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने १२.२५ कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन अय्यरला (shreyas iyer) खरेदी केले होते. इतकंच नाही तर KKR ने IPL 2022 साठी श्रेयस अय्यरकडे टीमचे कर्णधारपदही सोपवले आहे. यासोबतच संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही त्यांच्यावर विश्वास दाखवत सांगितले. “केकेआरमध्ये परत आल्याने खूप आनंदी आणि उत्साही आहे. आमचा कर्णधार श्रेयस केकेआरला विजेतेपद पटकावण्यास मदत करेल याची मला खात्री आहे. आमच्याकडे मजबूत संघ आहे. २०१४ मध्ये जेव्हा आम्ही आयपीएलचे विजेतेपद जिंकले तेव्हा मी या संघाचा भाग होतो आणि मला परत आल्याने आनंद झाला आहे.”

आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता पहिला सामना खेळणार आहे. श्रेयसला याआधीही दिल्लीचा कर्णधार म्हणून नेतृत्वाचा अनुभव आहे. तर दुसरीकडे अगदी नवखा कर्णधार म्हणून जडेजा चेन्नईची धुरा सांभाळणार आहे. गेल्या वर्षी मॉर्गनच्या नेतृत्वात उपविजेतेपद मिळवलेला नाईट रायडर्सचा संघ श्रेयसच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा जेतेपद मिळवेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!