Share

IPL 2022 : पहिल्या सामन्यातील पहिला बॉलच नो बॉल ; तर ऋतुराज डकवर परतला

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२ चा थरार स्टाईलने सुरू झाला आहे आणि या सुरुवातीसह उमेश यादवने या मोसमातील पहिली विकेट आपल्या नावावर केली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. गतवर्षी या मोसमातील स्फोटक फलंदाजीने धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड डक म्हणजेच शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) प्रथम फलंदाजी करण्यासाठी डेव्हॉन कॉनवे ऋतुराज गायकवाडसह (Ruturaj gaikwad) मैदानात उतरला होता. वानखेडे स्टेडियमवर उतरलेल्या केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्याच षटकात उमेश यादवच्या (umesh yadav) हातात चेंडू दिला आणि पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने संघाला जबरदस्त यशही मिळवून दिले.

पहिल्या ओव्हरमधील पहिला चेंडू उमेशने नो बॉल टाकला, पण गायकवाडला फ्री हिटचा फायदा उठवता आला नाही. यानंतर तिसऱ्या चेंडूवर उमेशने ऋतुराजला नितीश राणाकडून झेलबाद करत पॅव्हेलियनचा सरळ रस्ता दाखवला. १५ व्या मोसमातील पहिली विकेट गायकवाडच्या रूपाने पडली आणि हे यश उमेश यादवच्या नावावर आहे. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या केवळ ३ होती. वानखेडे स्टेडियमच्या या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना उसळी मिळताना दिसत आहे. तसेच श्रेयसचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय बरोबर ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!