मुंबई : आयपीएल २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्सने शानदार पदार्पण केले. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. दिल्लीने १७८ धावांचे लक्ष्य १० चेंडूत ६ गडी गमावून पूर्ण केले. मात्र, या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सला एक अस्वस्थ करणारी बातमी मिळाली. संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी तो अनुपलब्ध असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मार्शची दुखापत हा ऑस्ट्रेलियासाठीच नव्हे तर दिल्ली कॅपिटल्ससाठीही मोठा धक्का आहे.
मिचेल मार्शच्या हिपचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. जेणेकरून त्याची दुखापत किती गंभीर आहे हे कळू शकेल. त्यानंतरच त्याच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील सहभागाबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, त्याला ज्याप्रकारे वेदना होत आहेत, ते पाहता त्याची पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत भाग घेण्याची शक्यता फारच कमी आहे.
मार्शला आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ६.५० कोटी रुपयांना विकत घेतले. मार्श गेल्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच दिल्लीने एवढी मोठी किंमत देऊन या खेळाडूला आपल्यासोबत जोडले. मात्र आता त्याच्या दुखापतीने दिल्लीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, त्यातून सावरण्यासाठी त्याला ३-४ आठवडे लागतात.
असे झाल्यास मार्श आयपीएलच्या उत्तरार्धातच दिल्ली कॅपिटल्सकडून खेळू शकेल. मार्श याआधी आयपीएल २०२०मध्ये आरसीबीसोबत होता. मात्र दुखापतीमुळे तो केवळ एका सामन्यानंतर आयपीएलमधून बाहेर पडला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : तेरी झलक मोईन अली…! CSKच्या संघात आनंदाचं वातावरण; पाहा VIDEO!
- “…तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?”, ‘द कश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सवाल
- ‘पुष्पा २’ मधून सामंथा आउट? ‘या’ हिरॉईनला मिळणार संधी
- कर्नाटक राज्यातील ११७ किमी लांबीचा रस्ता ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार- नितीन गडकरी
- “सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते, त्यामुळे…”,अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

