🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी आपली चमक दाखवली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या उमरान मलिकपासून ते राजस्थान रॉयल्सच्या कुलदीप सेनपर्यंत सर्वांचीच चर्चा सध्या जोरात आहे. अर्शदीप सिंग, मोहसीन खान, मुकेश चौधरी यांच्यासह अनेक वेगवान गोलंदाजांनी या हंगामात सर्वांना खूप प्रभावित केले आहे. दरम्यान, या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीही खूश आहे.
गांगुलीने मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले, ”असे किती गोलंदाज आहेत जे १५० किमीवर गोलंदाजी करू शकतात? अनेकांना जमत नाही. उमरानची राष्ट्रीय संघात निवड झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. आपण त्याचा वापर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. उमरान सर्वात वेगवान आहे. मला कुलदीप सेनही आवडतो. टी. नटराजनने कमबॅक केले आहेत. आमच्याकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी असतील. शेवटी, ते निवडकर्त्यांवर अवलंबून आहे.”
https://twitter.com/sportstigerapp/status/1525447173252710402
आयपीएलच्या या हंगामात गोलंदाजांच्या वर्चस्वाबद्दल गांगुली म्हणाला, “गोलंदाजांचे वर्चस्व पाहून मला खूप आनंद झाला. मुंबई आणि पुण्याच्या विकेट खूप चांगल्या आहेत आणि ते चांगला बाऊन्स घेत आहेत. वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त, फिरकीपटू देखील चांगली गोलंदाजी करत आहेत.” उमरान मलिकच्या नावावर या हंगामातील सर्वात वेगवान आणि आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाच्या (१५७ किमी/प्रतितास) चेंडूची नोंदही झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

