Share

IPL 2022 : आयपीएलचा सर्वात झक्कास फोटो! आशीष नेहराचा ‘हा’ फोटो पाहिला का? एकदा पहाच!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा चॅम्पियन बनलेला गुजरात टायटन्सचा संपुर्ण संघ आणि खेळाडूंचे कुटूंबदेखील आनंद साजरा करत आहेत. गुजरातच्या खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी अहमदाबादमध्ये रोड शो केला. गुजरात सरकारने कर्णधार हार्दिक पंड्या आणि खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक आशीष नेहराचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या कुटुंबासह आयपीएल विजय साजरा करताना दिसत आहे.

आशीष नेहराची पत्नी रुश्मा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कौटुंबिक फोटो शेअर केले आहे. त्यामध्ये आशिष नेहरा आपल्या मुलांसह आणि पत्नीसह बेडवर बसलेला आहे. त्यांच्या मध्यभागी आयपीएल ट्रॉफी दिसत आहे. रुश्माने फोटोच्या कॅप्शनमध्ये एक खास संदेशही लिहिला आणि त्यात एक स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. व लिहिले की, नेहरा जी आणि संपूर्ण गुजरात टायटन्स संघाचा अभिमान आहे.

https://www.instagram.com/p/CeL4ggsvtD_/?igshid=YmMyMTA2M2Y=

आशीष नेहरा पहिला भारतीय प्रशिक्षक बनला आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आशिष नेहरा त्याच्या अनोख्या शैलीसाठी कायमच ओळखला जातो. मैदानातही आणि मैदानाबाहेरही तो खेळाडूंशी मोकळेपणाने वागतो. नेहराजीच्या नेतृत्वाखाली गुजरातने पदार्पणाच्या मोसमात विजेतेपद पटकावले आहे.

आशीष नेहराला गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक बनवल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण आशिष नेहराला या भूमिकेत अजून कोणी पाहिलं नव्हतं. पण त्याने त्याच्या कामगिरीने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. गुजरात टायटन्सने जेतेपद पटकावल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने असेही सांगितले की, आशिष नेहराने प्रत्येक खेळाडूसोबत खूप मेहनत घेतली आणि त्यांच्याशी कायम चर्चा साधली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!