Share

विश्वविजेता कप्तान…सितारा-ए-पाकिस्तान! पाक सरकारकडून वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीचा गौरव

Published On: 

मुंबई : २०१६च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी (Daren Sammy) याचा पाकिस्तान सरकारने गौरव केला आहे. सॅमीला पाकिस्तान सरकारने सितारा-ए-इम्तियाज (Sitara-e-Imtiaz) पुरस्काराने सन्मानित केले आहे. सॅमीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साहित्य, कला, क्रीडा, वैद्यक किंवा विज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पाकिस्तान सरकारकडून ही पदवी दिली जाते. वास्तविक सॅमी अलीकडेच पाकिस्तानी क्रिकेटशी जोडला गेला आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL)मध्ये तो पेशावर झल्मीचा प्रशिक्षक आणि कर्णधार आहे. सॅमीने पाकिस्तानमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनासाठीही खूप प्रयत्न केले होते. याच कारणामुळे सॅमीला ‘सितारा-ए-इम्तियाज’ ही पदवी देण्यात आली.

फोटो शेअर करताना सॅमीने लिहिले, ‘सितारा-ए-इम्तियाज माझ्यासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. मी क्रिकेटमुळे जगभर फिरलो. पाकिस्तान नक्कीच यापैकी एक ठिकाण आहे. ही एक अशी जागा आहे जी मला नेहमी घर असल्याचे जाणवते. पाकिस्तान सरकार आणि जनतेकडून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे ही सन्मानाची बाब आहे.”

सितारा-ए-इम्तियाज पुरस्कार हा पाकिस्तानमधील नागरी किंवा लष्करी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे. सॅमीने वेस्ट इंडिजसाठी ३८ कसोटी, १२६ एकदिवसीय आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सॅमीने कसोटीत १३२३ धावा केल्या होत्या, तर एकदिवसीय सामन्यात १८७१ धावा केल्या होत्या. सॅमीच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये ५८७ धावा आहेत. याशिवाय सॅमीने कसोटीत ८७, एकदिवसीय सामन्यात ८१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४४ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!