Share

IPL 2022 : केएल राहुलनं शेअर केले फोटो! चाहते म्हणतायत; म्हणूनच जिंकला नाही एलिमिनेटर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये प्रथमच सहभागी झालेला लखनऊ सुपर जायंट्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला. कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली. परंतु एलिमिनेटरच्या पुढे त्यांना जाता आली नाही. एलिमिनेटर २ च्या सामन्यात बंगलोर संघाने त्यांचा पराभव केला होता. आता कर्णधार केएल राहुल ब्रेकवर आहे आणि त्याने त्याचे हटक्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

नेटकरी केएल राहुलच्या या फोटोंवर मजेशीर कमेंट्स आणि मीम्सही बनवत आहेत. केएल राहुलने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याने कॅप्शन लिहिले आहे की त्याला प्रवास करायला आवडते. यासोबतच त्याने सोफ्यावर पडलेले फोटो शेअर केले आहेत.

केएल राहुलच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी लिहिले की त्यांना एलिमिनेटरमधून काढून टाकण्यात आले जेणेकरून ते प्रवास करू शकतील. तर काही युजर्सनी लिहिले की, मला सांग तू शूज घालून सोफ्यावर का बसला आहेस. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सने जबरदस्त खेळ दाखवला. त्यामुळे तो स्वत: धावांच्या बाबतीत बराच पुढे होता. केएल राहुलने या मोसमात ६१६ धावा केल्या आणि ऑरेंज कॅप शर्यतीत दुसऱ्या स्थानावर राहिला.

https://twitter.com/Aamir_Fighter/status/1531544915158573056?t=R0IhDb7BO5rpOscw30tXvA&s=19

आयपीएलनंतर आता केएल राहुल आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. जिथे तो भारतीय संघाची कर्णधारपदाची कमान सांभाळणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत फक्त केएल राहुल युवा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारताला ९ जूनपासून आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!