Share

“वडील असूनही एकट्या आईने सांभाळ केला”; आईच्या आठवणीत अर्जुन कपूर भावूक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरला बॉलीवूडमध्ये एक दशक पूर्ण झालं आहे. अर्जुनने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, “आयुष्यात एक गोष्ट खूप चांगली घडली. मी आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहिलो नाही.”

अर्जुन सांगतो की, “माझे वडील बोनी कपूर यांच्याकडून मी आजपर्यंत कोणतीही गोष्ट घेतलेली नाही. मी ज्यावेळी अभिनेता नव्हतो तेव्हा कधीतरी मला गरज पडली, तरच मी वडिलांची मदत घ्यायचो. दिवंगत आई मोना कपूरबद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला की, “आईने बहिणीचे आणि माझे संगोपन खूप चांगल्या प्रकारे केले.”

“आज माझी आई असती तर तिने माझे चित्रपट पहिले असते. माझ्या आईला माझ्याबद्दल खूप अभिमान वाटला असता, कारण मी चांगलं काहीतरी करतोय.” असंही अर्जुन भावूक होत म्हणाला अर्जुन कपूरच्या आईचे रक्तदाब आणि कर्करोग या विकारांमुळे अनेक अवयव निकामे झाले होते. २०१२ मध्ये त्याचं निधन झालं. अर्जुन कपूरची आई मोना कपूर टिव्ही मालिकांची प्रोड्यूसर होती. आईच्या निधनानंतर दोन महिन्यांनी अर्जुन कपूरने ‘इशकजादे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

अर्जुन कपूर म्हणतो की, २०१८ मध्ये श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी आणि ख़ुशी कपूर या दोन बहिणी मिळाल्या. वडील बोनी कपूर देखील त्याला आणि बहिण अंशुला कपूर कुटुंबाचा एक महत्वाचा भाग मानतात. मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो. माझ्या आईने मला खूप मजबूत बनवलं आणि टीका करणाऱ्या लोकांशी लढायला देखील तिनेच शिकवलं. त्यामुळे आपल्यासाठी परिवारापेक्षा कोणी मोठं नाही, असं अर्जुन कपूर सांगतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!