🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी मुंबई इंडियन्सवर ३ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यातील पराभवाचा सिलसिला तोडला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या विजयामुळे हैदराबादच्या प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या काहीश्या आशा जिवंत राहिल्या आहेत. हैदराबादचे १३ सामन्यांमध्ये १२ अंक झाले आहेत. परंतु ते आजूनही गुणतालिकेत ८व्या स्थानावर आहेत. हैदराबादला शेवटचा सामना पंजाब संघासोबत २२ मे ला खेळायचा आहे. हैदराबादला पुढील सामना मोठ्या फरकाने जिंकून दिल्ली आणि बंगळूरू त्यांचे पुढील सामने जिंकण्यात अपयशी ठरतील अशी आशा करावी लागेल.
आयपीएल २०२२ हंगामात साखळी फेरीतील ५ सामने शिल्लक राहिले आहेत. तरीही अजून प्लेऑफचे चित्र स्पष्ट झालेले नाही. मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. मात्र इतर ८ संघ आजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची समीकरणे बनवत आहेत. आत्तापर्यंत फक्त गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्यासोबतच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकण्यासाठी खेळाडूंमध्ये स्पर्धाही वाढली आहे.
Points table of IPL 2022 – Except MI and CSK, all teams alive in this IPL 2022 for the playoffs spot. pic.twitter.com/ZALTWC1fdK
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 17, 2022
ऑरेंज कॅप – जोस बटलर (६२७ धावा)
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आतापर्यंत १३ सामन्यांत ५२.२५च्या सरासरीने तीन शतके आणि तीन अर्धशतकांच्या सहाय्याने ६२७ धावांसह ऑरेंज कॅपच्या यादीत आघाडीवर आहे. हैदराबादचा फलंदाज राहुल त्रिपाठीने मुंबई विरुद्ध मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत ७६ धावा केल्या. त्यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो ८व्या स्थानावर पोहोचला आहे. त्रिपाठीने आत्तापर्यंत १३ सामन्यांत ३९.३ च्या सरासरीने तीन अर्धशतकांच्या सहाय्याने आणि १६१.७२ च्या स्ट्राइक रेटसह ३९३ धावा केल्या आहेत. लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अनुक्रमे ४६९ आणि ४२७ धावांसह ऑरेंज कॅपच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
पर्पल कॅप – युझवेंद्र चहल (२४ विकेट)
राजस्थान रॉयल्सचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहल १३ सामन्यांत १६.८३ च्या सरासरीने २४ विकेट्ससह पर्पल कॅपच्या यादीत आघाडीवर आहे. हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने मुंबई विरुद्ध खेळलेल्या सामन्यात 3 गडी बाद केल्याने तो आता कॅपच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान गोलंदाज उमरान मलिकने १३ सामन्यांत २० च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत. बंगळूरूचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा आणि पंजाबचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा अनुक्रमे २३ आणि २२ विकेट्ससह पर्पल कॅपच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

