मुंबई : आयपीएल २०२२ चा मेगा ऑक्शनचा १२ आणि १३ फेब्रुवारीला बँगलोर येथे होणार आहे. यावेळी स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ असणार आहेत. या संघांनी आतापर्यंत ३३ खेळाडूंना रिटेन केले आहे. मेगा ऑक्शन मध्ये १५ देशांतील ५९० खेळाडू सहभागी होणार आहेत.ऑक्शनमध्ये मोठ्या नावांचा सहभाग आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंवर १० कोटींहून अधिकची बोली लावली जाऊ शकते. या हंगामात सध्यातरी केएल राहुल हा सर्वात महागडा खेळाडू आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला संघाचा कर्णधार बनवत १७ कोटी रुपये दिले आहेत.
आयपीएल मध्ये संघांनी अनेक खेळाडूंना मोठंमोठ्या किंमतीत खरेदी केले आहे. यात अशा काही भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ज्यांना भारतीय संघात खेळण्याची जास्त संधी जरी मिळाली नाही तरी ते करोडपती झाले आहेत. यात पहिले नाव जयदेव उनाडकट याचे येते. त्याला आईपीएल मधून आता पर्यंत ३७ कोटी मिळाले आहे. त्याला राजस्थानने एकदा ८ तर एकदा ११ कोटी मध्ये विकत घेतले होते. दुसरे नाव आहे कर्ण शर्मा याचे. त्याने भारतासाठी ८ वर्षांपासून एकही सामना खेळला नाहीये. त्याला आतपर्यंत ३३ कोटी मानधन मिळाले आहे.
फिरकीपटू कृष्णप्पा गौथम याने भारताकडून केवळ एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. त्याला आयपीएलमधून ३० कोटी कमावले आहेत. यानंतर भारतीय संघासाठी त्रिशतक झळकावणारा करूण नायर याला आतापर्यंत २७ कोटी मिळाले आहेत. तर भारतीय संघाचा सर्वात जुना खेळाडू सौरभ तिवारी ज्याने भारतीय संघाचा शेवटचा सामना १२ वर्षांपूर्वी खेळला होता. त्याला आतापर्यंत २७ कोटी मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे” जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
- “बालिश आरोप करण्यापेक्षा राऊतांनी न्यायालयात जावे”,अतुल भातखळकरांचा टोला
- एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
- “…ऑफर नाकारली म्हणून”, संजय राऊतांचे थेट उपराष्ट्रपतींना पत्र; ईडीवर केले खळबळजनक आरोप
- “राहुल गांधी देशाबद्दल बोलतात आणि नरेंद्र मोदी…”; काँग्रेसची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
