🕒 1 min read
मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील तसंच दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस झाले असतील अशा प्रवाशांना 15 ऑगस्टपासून उपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली. सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असं आवाहनही त्यांनी केलं.
स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसंच उपनगरी रेल्वे स्थानकांमधून छायाचित्रयुक्त पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासवर क्यू आर कोड असतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील माहिती सायंकाळी आठ वाजता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करताना त्यांच्या मागे ठेवलेल्या झेंड्यांवरुन नवीन वाद निर्माण झालाय. पुण्यामधील वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केली असून ती सध्या चर्चेत आहे.सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या लाइव्ह भाषणामधील स्क्रीनशॉर्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. “भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती,” असं म्हणत सरोदे यांनी नाराजी व्यक्त केलीय.
असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट
भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती. खरे तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये. दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला उत्सवी स्वरूपात मिरविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो. अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्मध्वजच महत्वाचे आहेत.
इतर कोणातच ध्वज महत्वाचा नसलेले भारतीय नागरिकच या देशाला अखंड ठेवतील. लोकशाही अशाच नागरिकांच्या व नेत्यांच्या शोधात आहे. भारतीय ध्वज संहिता indian flag code सगळ्यांनी वाचवा तसेच याबाबतच्या नियमांची माहिती घ्यावी.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी; मनसेच्या ‘या’ प्रश्नांची उत्तरं सरकार देणार काय ?
- सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते ?
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त खेळ दाखवणाऱ्यांचे विराट-रोहितकडून खास शब्दात अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
