🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील वरळीच्या बीडीडी चाळ क्रमांक ३ मध्ये सिलिंडर स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये उपचारादरम्यान मंगेश पुरी या चार महिन्याच्या बालकाचा १ डिसें. रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे वडील आनंद पुरी यांचा ४ डिसें. तर आई विद्या पुरी यांचा काल मृत्यू झाला. सोबतच या दुर्घटनेत एक पाच वर्षाचा मुलगा १५ ते २० टक्के होरपळला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वरळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर तसेच महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर टीका करत अशा काळात महापौर कुठे निजल्या, असे वक्तव्य केले होते. यावरून सेना आक्रमक झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी विश्वास नांगरे पाटील (vishwas nangare patil) यांची भेट घेतली.
भाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात सेना महिला आघाडी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. नगरसेविका विशाखा राऊत, मीनाताई कांबळे यांच्यासह मुंबईतील सर्व महिला विभाग प्रमुखांनी तसे पत्र दिले आहे. महापौरांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान आहे, असं म्हणत शेलारांविरुद्ध कारवाईची मागणी यावेळी केली आहे.
दरम्यान, आशिष शेलार यांच्या टीकेवर पेडणेकर म्हणाल्या की,’आशिष शेलार भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना त्यांच्यात पक्षात काही स्थान उरले नाही. मी निजले असे म्हणताय तर कोविड काळात (COVID) तुम्ही काय अंगाई गात होतात का?, उत्तर प्रदेशात ६० मुलं ऑक्सिजनविना गेली, तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या. अशाप्रकारचे वक्तव्य हा महिलांचा अवमान आहे. आपण कोणाविषयी बोलतो आहोत, याचे भान त्यांना राहिलेले नाही, असे प्रत्युत्तर पेडणेकरांनी शेलारांना दिले.
महत्वाच्या बातम्या
- राजकारण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक प्रतिक्रिया
- ‘नागालँड प्रकरणाची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ कधी होणार?’, खा. राऊतांचा सवाल
- ‘गुप्तचर यंत्रणेच्या चुकीच्या माहितीमुळेच नागालँडमधील अमानुष प्रकार घडला’
- संयुक्त किसान मोर्चाची आज महत्वाची बैठक; आंदोलन मागे घेण्याची शक्यता
- रजिस्टर लग्न करत जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने सर्वांपुढेच ठेवला एक चांगला आदर्श
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
