Share

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी ग्रामपंचायतींना महत्त्वाच्या सूचना

Published On: 

औरंगाबाद : शेतीच्या माध्यामातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी. या उद्देशासाठी जमिनीची सुपिकता व रासायनिक खतांच्या संतुलित मात्रा निर्देशांक फलक ग्रामपंचायतस्तरावर व कृषी सेवा केंद्रावर प्रदर्शित करण्याच्या सुचना कृषी आयुक्तांनी कृषी विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत.

कृषी आयुक्तांनी दिलेल्या सुचनात म्हटले आहे की, निर्देशांकानुसार त्या गावातील मुख्य व सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता समजून येतात. तसेच त्या गावातील मुख्य पिकांसाठी संबंधित कृषी विद्यापीठाच्या खत शिफारशीद्वारे रासायनिक खतांच्या संतुलित मात्रा देता येतात. सदरचा फलक गावामध्ये केवळ प्रदर्शित न करता त्याचे सामुहिक वाचन करण्यासाठी तसेच त्या गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्व, रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर, सेंद्रीय खतांचा वापर, रासायनिक खतांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम इ. बाबींवर त्यांना कृषी सहाय्यकांनी मार्गदर्शन करावे,

यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळवून त्याबाबतच्या नोंदी दफतरी दाखल ठेवाव्यात. तसेच जमीन सुपिकता निर्देशांकाच्या फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम घेताना त्या गावातील कृषी सेवा केंद्र धारकांचा त्यामध्ये समावेश करावा व त्यांच्या मार्फत फलकाचे व खत वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, तसेच सुपिकता निर्देशांकाचा फलक ग्रामपंचायत कार्यालयाव्यतिरिक्त त्या गावातील मुख्य कृषी सेवा केंद्रांमध्ये सुद्धा लावण्यासाठी केंद्र चालकास प्रवृत्त करावे. जेणेकरून शेतकरी रासायनिक खते खेरदी करताना त्या गावासाठी संबंधित मुख्य पिकांच्या किती खतमात्रा (हेक्टरी व एकरी) विकत घेणे आवश्यक आहेत ते समजू शकेल व अनावश्यक खतांची खरेदी टाळता येणे शक्य होईल, असे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!