पुणे – 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज 2 ऑगस्टपासून सुरु होणार असून त्या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत. दरम्यान शरद पवार आयोगाला हिंसाचार प्रकरणी आयोगाला काय सांगणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाची मुदत गतवर्षी एप्रिल महिन्यात संपली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली, मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काम ठप्प होते. आता 2 ऑगस्टपासून आयोगाचे कामकाज सुरू होत आहे. याप्रकरणी प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत.
शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाच्या संदर्भात काही वक्तव्ये केली होती.भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
वकील प्रदीप गावडे यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तत्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. दरम्यान, आयोगाने यावर शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष न्या. जे. एन. पटेल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला धक्का देत या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)कडे सोपवला. भीमा कोरेगाव हिंसाचार हे षड्यंत्र होते, असा दावा करत कोरेगाव-भीमा प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर लगेच केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- छावणी भागात बायोमेडिकल वेस्टचा ढिगारा, पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
- महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयात दिली शेणाची गौरीची भेट, इंधन दरवाढीचा निषेध
- कोविडचा फायदा घेत मुंबईतील 500 गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांकडून परस्पर बिल्डरच्या घशात?
- रिक्षा चालकाने प्रवासी वृध्दाची बॅग लांबवली
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

