🕒 1 min read
लातूर : केंद्रसरकारच्या चुकीच्या धारेणामुळे स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेलची इंधन दरवाढ आणि डाळ, खाद्यतेल आदी वस्तुंची मोठ्या प्रमाणात कृत्रीम महागाई झाली आहे. ही सर्व प्रकारची महागाई वाढल्याने आणि कोरोनाने हातचे रोजगार गेल्याने सामान्य माणूस पिचून गेला आहे. विशेषत: महीलांना घर चालविणे मुश्कील झाले आहे. ही वाढती महागाई तत्काळ कमी करण्यासाठी केंद्रसरकारने पावले उचलावीत अन्यथा सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा लातूर महीला काँग्रेसकडून जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय.
इंधन आणि जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या महागाईने सामान्य जनता होरपळून गेली आहे. ही वाढती महागाई मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीने आंदोलनाची हाक दिली आहे. या अनुषंगाने लातूर शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष प्रा.डॉ. स्मिता खानापूरे, लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनिता आरळीकर व महाराष्ट्र प्रदेश सचिव सपना किसवे यांनी पुढाकार घेऊन महिला काँग्रेसच्या वतीने निर्दशने करून महागाईचा निषेध केला. ही वाढती महागाई तत्काळ मागे घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. सामान्य माणसाची लुटमार करणारी इंधन आणि जीवनावश्यक वस्तुची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली. निवेदनासोबत शेणाची गौरी भेट देऊन वाढत्या महागाईचा अभिनव पद्धतीने निषेध करण्यात आला.
गॅस, पेट्रोल-डिझेल हा सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. डिझेलचे दर वाढल्यास वाहतुकीचा खर्च वाढतो व एकूणच सर्व वस्तूंच्या किंमती वाढतात. ही दरवाढ सामान्य लोकांना परवडणारी नसून यामुळे सर्वसामान्य माणसचे घर खर्चाचे गणित बिघडून जात आहे. हा सर्व त्रास लक्षात घेता केंद्र सरकारने तत्काळ गॅस सह इंधनाचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यायला हवा. अगोदरच कोवीड-१९ आजाराने सर्व नागरिक त्रस्त असताना त्यांना आधार देण्याऐवजी केंद्र सरकार इंधन दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांची लूटमार करत आहे. ती तत्काळ थांबवावी अशी मागणी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने यावेळी करण्यात आली.
शेणाची गौरी भेट : गॅसची दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईमुळे गृहीणीचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी महिला काँग्रेसकडून निवेदनासोबत शेणाची गौरी भेट देण्यात आली. तसेच महागाई कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
