🕒 1 min read
औरंंगाबाद : रिक्षा चालकाने सेवानिवृत्त वृध्दाची बॅग लांबविल्याची घटना ७ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास सिडको, एन-२ भागात घडली. अनंत प्रभाकर भुमकर (वय ५६, रा. अजिंक्य सिटी, एच बिल्डींग, लातूर) असे प्रवासी वृद्धाचे नाव आहे.
दुपारी एकच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावरुन सिडको, एन-२ भागातील अरोरा हॉटेल येथे रिक्षाने (एमएच-२०-ईएफ-२६९९) आले. त्यावेळी त्यांची कपडे, न्यायालयाची व घराची मुळ कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात होती.
त्यानंतर रिक्षाचे भाडे देण्यासाठी भुमकर हे खाली उतरताच रिक्षा चालकाने बॅगसह धुम ठोकली. हा प्रकार घडताच भुमकर यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस तपास करीत असून त्या रिक्षा चालकाचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
