Share

छावणी भागात बायोमेडिकल वेस्टचा ढिगारा, पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे महामार्गावर छावणी परिसरात काही अज्ञात मेडीकल किवा हाॅस्पिटल धारकाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेडीकल मधील गोळ्या, औषध, सलाईन विविध प्रकारचे इंजेक्शन या ठिकाणी आणुन टाकले आहेत. हे सर्व वेस्ट मटेरियल आणि मुदत संपलेल्या गोळ्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा वैद्यकीय कचरा कोणी आणुन टाकला यावर मात्र प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. मनपा हद्दीत असे प्रकार घडत असतील तर याची सर्वस्वी जबाबदारी पालिकेची असल्याची टीका प्रत्यक्षदर्शी रिपब्लिकन पार्टीचे मनिष नरवडे यांनी केली आहे.

कोरोनाच्या महामारीने अगोदरच जनता त्रस्त झाली आहे. आरोग्य विभागाने घालुन दिलेल्या नियमांना पायदंळी तुडवत काही मुजोर हाॅस्पिटल चालक व मेडीकल चालक हे मुदत संपलेल्या गोळ्या, औषधी, हॅन्डगोल्ज इंजेक्शन असे रस्त्यावर कुठेही फेकत आहेत. हा सर्व प्रकार तेव्हा लक्षात आला जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे या ठिकाणावरून जात होते. त्यांनी या संदर्भात माहिती कळवली आहे.

बायोवेस्ट मेडीकल हे छावणी मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणावर पडलेले होते. या परिसरात जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. जनावरांच्या खाण्यात जर बायोवेस्ट मेडीकल व औषधी इजेक्शन आले तर जनावरांची जिवितहानी होऊ शकते. असे प्रकार जर औरंगाबाद शहरात दाट रहदारीच्या ठिकाणी होत असेल तर महानगरपालिका आरोग्य विभाग या प्रकाराकडे कधी गांभीर्याने बघणार आहे. हे बायोवेस्ट मेडीकल फेकणा-यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनीष नरवडे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!