मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, आजही अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. यासंबंधित पत्र त्यांनी वकिलांमार्फत ईडीला दिलं आहे. दरम्यान, या पत्रात त्यांनी ईडीच्या तपासावर आरोप देखील केले आहेत.
अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्यास नकार देत ईडीला वकिलांमार्फत पत्र दिलं आहे. यामध्ये त्यांनी याआधी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच मागण्या आता देखील केल्या आहेत. माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. तसंच, मला ECIR ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी केली आहे.
दरम्यान, या पत्रात नवा मुद्दा आहे तो म्हणजे ३ ऑगस्टला म्हणजेच उद्या अंतरिम दिलासा मिळावा यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे. त्यामुळे मी चौकशीला हजर राहू शकत नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी त्यांच्या पत्रात ईडीच्या तपासावर आरोप केले आहेत. ईडीकडून केला जाणार तपास हा निष्पक्ष आणि न्याय्य नसल्याचं देशमुखांनी पत्रात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिक्षणमहर्षी, मराठवाड्याचे साने गुरुजी सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

