Share

छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता; ‘आगे आगे देखो होता है क्या?’

Published On: 

पुणे : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भातील निकाल दिला आहे. छगन भुजबळ यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी यांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.

याप्रकरणावरुन सध्या चर्चेत असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांवर सातत्याने आरोपांच्या फैरी झाडत आहेत.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांना छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी अधिक काहीही न बोलता आगे आगे देखो होता है क्या? एवढंच उत्तर देणं पसंत केले आहे. तर दुसरीकडे मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे. ‘छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन केस मधून डिस्चार्ज मिळाला आहे. ह्या डिस्चार्ज ला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे.’ असे ट्वीट दमानिया यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!