Share

भारतीय संघावरती दुखापतीच सावट; पंतसह जडेजा देखील मैदानाबाहेर

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतीची चिंता सतावत आहे. भारताने अनेक फलंदाज या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाले आहेत. आता नुकतेच सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीदरम्यान रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

पंत आणि जडेजाला भारताच्या पहिल्या डावात शनिवारी (९ जानेवारी) फलंदाजी करताना दुखापत झाली. पंतच्या डाव्या हाताच्या कोपराला पॅट कमिन्सचा चेंडू लागला त्यामुळे त्याला शनिवारी दुसऱ्या सत्रानंतर हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. त्याच्याऐवजी वृद्धिमान साहा यष्टीरक्षणासाठी मैदानात आला आहे. जडेजाच्या ऐवजी मयंक अगरवाल क्षेत्ररक्षणासाठी उतरला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस असून भारताचा पहिला डाव १००.४ षटकात २४४ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ ९४ धावांनी पिछाडीवर पडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!