Share

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन्स केंद्राने त्वरीत उपलब्ध करुन द्यावेत: राजेश टोपे

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना एम्फोटेरीसीन बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या राज्यभरात हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रमध्ये या इंजेक्शनचा तीव्र जाणवत आहे.

या इंजेक्शनवर सध्या केंद्र सरकारचं नियंत्रण असल्यानं त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रासाठी ते उपलब्ध करुन द्यावं, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यावेळी ते म्हणाले कि, ‘रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार दररोज सहा याप्रमाणं एकूण ६० ते १०० इंजेक्शन्स रुग्णाला दिली जातात. राज्यानं सध्या १ लाख ९० हजार अॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. पण ज्या फार्मा कंपन्या हे इंजेक्शन बनवतात ते सध्या याचा पुरवठा करत नाहीएत. कारण याच्या पुरवठ्यावर पूर्णपणे केंद्र सरकारचं नियंत्रण आहे. त्यामुळे राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक असल्यानं केंद्रानं लवकरात लवकर राज्याला उपलब्ध करुन देण्याची परवानगी द्यावी.’ अशी मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!