अहमनगर: माणसांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत असतानाच आता काही ठिकाणी जनावरांना देखील ‘लंपी स्किन डिसीज’ या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता माणसांप्रमाणे जनावरांना देखील कॉरंटाईन करण्याची वेळ आली आहे. परंतु या संक्रमणाची वेळीच दखल घेऊन वैद्यकीय तज्ञांच्या घेतल्या 100% धोका होऊ शकतो असे कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी सांगितलं.
परजणे म्हणाले, ‘लम्पी स्किन डिसीज’ हा आजार प्रामुख्याने गोवंशिय जनावरांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आजार आहे. कॅप्रीपोक्स प्रवर्गातील विषाणूमुळे हा आजार बळावतो. तर देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या आजारांना लवकर बळी पडतात दमट वातावरणामुळे कीटकांची मोठी वाढते. देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरं या लवकर बळी पडतात. दमट वातावरणामुळे कीटकांची मोठी वाढ होते. विशेषतः चवणाऱ्या माशा, डास, गोचिड, वेगवेगळे कीटक त्यांच्यामुळे या रोगाचा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या झाडावर पर्यंत पोहोचतो.
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतीये, कंगणा राणावतचा आरोप
संक्रमण झाल्यानंतर किमान दोन आठवड्यांपर्यंत तो जनावरांच्या रक्तामध्ये राहते मग शरीराच्या इतर भागातही संक्रमण होत जात लसिका ग्रंथीना सूज येते. एक आठवडाभर भरपूर ताप येतो त्वचेवर हळूहळू दहा ते पंधरा मिनिट मी मि च्या गाठी तयार होतात. हा झूनोटिक रोग प्रकारातील आजार नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे पशुपालकांनी आजाराला घाबरून न जाता जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून जनावरांना औषधोपचार करून घ्यावा.
मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावं हा त्यांचा अधिकार ; संजय राऊतांच विरोधकांना उत्तर
लंम्पी रोगामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात मोठी घट होते गर्भपात आणि रोगग्रस्त वासरांचा जन्म होण्याची अधिक शक्यता असते संक्रमण झाल्यानंतर किमान दोन आठवड्यांपर्यंत तेथे जनावरांच्या रक्तामध्ये राहते मग शरीराच्या इतर भागातही संक्रमण होत जात लसिका ग्रंथी ना सूज येते. तर जनावरांचे गोठे मुक्त स्वच्छ ठेवावेत कीटक प्रतिबंध औषधांची वेळच्यावेळी फवारणी करावी बाधित जनावरांच्या निरोगी जनावरांपासून दूर ठेवावे अशा उपाययोजना त्याचवेळी केल्यास रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी चांगलीच मदत होऊ शकते.
मंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, मंत्री महोदय निगेटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

