मुंबई : गेले ५ महिने कोरोनाने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे. अजूनही राज्यासह देशातील आकडे हे वाढतच असून दुसरीकडे अनलॉक-४ आता लागू करण्यात आलं आहे. यात जिल्हाबंदीसह अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यात आली. आता, राज्यातील प्रार्थना स्थळे उघडी करण्यासाठी भाजपा, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम सारख्या विरोधी पक्षांनी आक्रमकता घेतली असून महाविकास आघाडी विरोधात आंदोलने करत आहेत.
यासर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केले आहे. त्यांनी सद्याची परिस्थिती बघता मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय योग्य असून कोरोनाचा धोका संपला कि प्रार्थना स्थळे सुरु करण्यात येतील असे सांगत विरोधक या मुद्द्याचा राजकारणासाठी उपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, मंत्री महोदय निगेटिव्ह
तर, गेले अनेक महिने संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरीच असून बाहेर आढावा वा दौरा, तसेच मंत्रालयात देखील जात नसल्याने सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होत असून प्रशासनाचा गलथान कारभार चालल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर देखील संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ” राज्यभर संपूर्ण मंत्रिमंडळ फिरतंय. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत ते पाळले जात आहेत,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
चिखलदऱ्याचे सौंदर्य खुलणार, विकासकामे तातडीने पूर्ण करा… या मंत्री महोदयांनी दिलेत आदेश


