पुणे : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
दरम्यान आता नाशिक, मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता पुण्यातही डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेल्टा प्लस संसर्गाचे रुग्ण आढळल्यानंतर आता शहरातही एक रुग्ण आढळला आहे. हडपसर मुंढवा परिसरात हा डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला असून पालिकेनं त्याला होम आयसोलेशनमध्येच ठेवलं आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य मित्र आणि नातेवाईकाचं शोध घेतला जात आहे.
दरम्यान काल मुंबई येथे डेल्टा प्लस या विषाणूची लागण झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या महिलेने कोविड वरील लसचे दोन्ही डोस घेतले होते. या माहितीला मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून आरोय यंत्रणा अलर्ट झाली आहे. डेल्टा प्लसने झालेला हा मुंबईतील पहिला मृत्यू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाबा, मला माहितीये तुम्ही मला ऐकताय…’; विलासरावांच्या आठवणीत रितेशचा खास व्हिडीओ
- ‘प्रकाश आंबेडकर सोबत आले, तरच रिपब्लिकन ऐक्य शक्य’, रामदास आठवलेंची भूमिका
- पुण्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
- अभिनेता सुव्रत जोशी ‘जॅाबलेस’ वेब सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
- तालिबानी हिंसाचाराने गाठला कळस ; राष्ट्रपती राजीनामा देऊन कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

