औरंगाबाद : मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. अनेकांचे शिक्षण बंद असल्यामुळे अनेक मुले शाळाबाह्य झाली आहेत. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने कोविड नियमांचे पालन करतात शाळा सुरू करण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी शेकाप प्रणित पुरोगामी शिक्षक शिक्षकेतर संघटनेतर्फे ‘दार उघड बये आता दार उघड’ आंदोलन मंगळवारी (दि.१७) क्रांती चौकात करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बालमजुरीचे प्रमाणही वाढले आहेच. सोबतच अनेक मुलींचे बाल विवाहही लावून देण्यात आले आहेत. गरीब विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जात आहे. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत मत व्यक्त केले आहे. शाळा सुरू न झाल्यास मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होईल.
त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात. सध्या राज्यातील शहरांमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. आणि शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जात असलेल्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी कोरोना नियमांचे पालन सुरु करण्याचे निर्देश शासनाने द्यावे. अशी मागणी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, संजय जाधव, भागवत शिंदे आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करत समाजासमोर ठेवला आदर्श
- ‘देवमाणुस’ परत येणार? अपुर्ण कथानकामुळे चर्चेला उधान
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- स्टीव्ह स्मिथ आणि ऍरोन फिंच टी-२० विश्वचषकात पुनरागमन करणार?
- ‘लिंगसमभावाच्या दृष्टीने पडलेले हे एक महत्त्वाचे पाऊल’, सु्प्रीम कोर्टाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंकडून स्वागत


