नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीने कोव्हीड-१९ साठी विकसित केलेल्या रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट किटचे केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आयआयटी दिल्ली संशोधकांनी, संस्थेच्या जैववैद्यकीय अभियांत्रिकी केंद्राचे प्राध्यापक डॉ. हरपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही किट विकसित केले आहे.
आयआयटी दिल्लीने जुलै २०२० मध्ये ३९९ रुपयात आरटी-पीसीआर किट तयार केले होते. त्यामुळे या किटची किंमत कमी आण्यासाठी मदत झाल्याचे आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक व्ही. रामगोपाळ राव यांनी यावेळी बोलताना सांगितले. आज जारी करण्यात आलेल्या संचामुळे ग्रामीण भागात निदान सुलभ आणि माफक दरात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना विषाणू अॅन्टीजेनसाठी मोनोक्लोनल प्रतिपिंडावर आधारित ही क्रिया राहील. यातून प्राप्त झालेले परिणाम गुणात्मक आधारित असतील आणि अनुमान केवळ साध्या डोळ्यांनी लावता येईल. तंत्रज्ञान आणि उत्पादन हे पूर्णपणे स्वदेशी आहे.
Hon'ble Minister of State for Education Shri Sanjay Dhotre launched a Rapid Antigen Test kit for COVID-19 developed by IIT Delhi today.
Read more: https://t.co/RMgX5x92nz pic.twitter.com/Ylgb92pTOD
— IIT Delhi (@iitdelhi) June 25, 2021
आयआयटी दिल्ली संशोधकांचे आणि उत्पादक भागीदारांचे अभिनंदन करत हे तंत्रज्ञान, देशात कोविड चाचण्या उपलब्धतेत क्रांतिकारी बदल घडवेल असा विश्वास संजय धोत्रे यांनी व्यक्त केला. आयआयटी दिल्ली मध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून हा संच विकसित करण्यात आला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्राध्यापक हरपाल सिंग, डॉ दिनेश कुमार यांचे अभिनंदन करतानाच देशातच विकसित केलेले तंत्रज्ञान आणि देशातच निर्मित उत्पादनांचा वापर करून कोरोना विरोधातल्या लढ्यात आत्मनिर्भर होण्यासाठी देशाला सहाय्य करत असल्याबद्दल धोत्रे यांनी आयआयटी दिल्लीचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत अनेक भागांमध्ये आठव्या दिवशीही निर्जळी, मनपाचे पाणीपुरवठा अधिकारी ‘आऊट ऑफ रिच’!
- ‘या’ कारणामुळे आणीबाणीवर संघ आणि भाजपाने बोलूच नये; काँग्रेसचा पलटवार
- गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव
- ‘काही जणांची CBI चौकशीची मागणी केल्यावर संजय राऊतांच्या छातीत कळ का आली ?’
- मराठवाड्यातील मराठा समाजाला ‘मराठा कुणबी’ प्रमाणपत्र द्या!


