🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. १८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजानी १७७ धावांत रोखले. या विजयामुळे भारताने ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. शनिवारी होणारा अंतिम सामना दोन्हा संघासाठी निर्णायक असणार आहे.
नाणेफेक हरल्यानंतर इंग्लंडच्या संघाने भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. रोहित-के.एल. राहुल दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यांनतर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या सुर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी करत अर्धशतक झळकावले. सुर्यकुमार यादवने ३१ चेंडुत ५७ धावा केल्या. सुर्यकुमारच्या अर्धशतक आणि श्रेयस अय्यर-पंत यांच्या साहाय्याने भारताने इंग्लंडसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले.
दुसऱ्या डावात भारताने मागील सामन्यातील सामनावीर बटलरला स्वस्तात माघारी पाठवले. यानंतर जेसन रॉयने डाव सावरत ४० धावांची खेळी केली. रॉय बाद झाल्यानंतर बेन स्टाेक्सने संयमी खेळी करताना ४६ धावा काढल्या. तसेच बेयरस्ट्रोने २५ धावांची खेळी केली. यानंतर भारतीय गोलंदाजानी तिखट मारा करत इंग्लंडच्या संघाला १७७ धावांत रोखले. या विजयासह भारताने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. अर्धशतकी खेळीसाठी सुर्यकुमार यादवला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवीण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद मध्ये कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आढळले १५५७ कोरोनाबाधीत
- मराठी आभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापटला यांना कोरोनाची लागण
- एमबीए आणि तेही क्रिकेटमध्ये? ऑस्ट्रेलीया क्रिकेटने सादर केली संकल्पना
- बालाजी मंदिर संस्थानची शेजमीन हडपणार्यावर गुन्हा
- तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव! ‘या’ अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
