मुंबई : मागील अनेक वर्षापासून लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असलेली दुरचित्रवाणीवरील मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. मात्र या मालिकेच्या चाहत्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसापासून वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेते कोरोना पॉझीटिव्ह आढळले आहेत. बॉलीवूडनंतर कोरोनाने आता टिव्ही क्षेत्रात शिरकाव केला असुन लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवरील एका कलाकारला कोरोनाची लागण झाली आहे.
सब टिव्ही वरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील मुख्य पात्र असलेल्या दयाबेन म्हणजे दिशा वकानी हीच्या भावाची सुंदरलालची भुमिका करत असलेल्या अभिनेता मयूर वकानी ची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली आहे. दयाबेनचा भाऊ सुंदरलाल या मालिकेत कधीतरीच दिसतो. जेठालाल आणि सुंदरलाल यांची दमदार केमिस्ट्री शोमध्ये पाहायला मिळते. पण आता सुंदरलालची भूमिका करत असलेला अभिनेता मयुर वकानी याची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने ‘तारक मेहता’च्या टीमची चिंता वाढली आहे.
महत्वाची बाब म्हणजे सुंदरलाल म्हणजेच मयुर वकानी हा दयाबेन म्हणजेच दिशा वकानीचा रिल आणि रिअल भाऊ सुद्धा आहे. सुंदरलालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं संपूर्ण टीम चिंताग्रस्त आहे. काही कालावधीपुर्वीच सुंदरलालसोबत मालिकेतील इतर पात्रांनी चित्रीकरण केलं होतं. त्यामुळे आता पूर्ण टीमला आपली कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे. जर आणखी कोणत्या सदस्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर ही गोष्ट टीमसाठी मोठी समस्या उभी करू शकते.
महत्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यात 19 ते 25 मार्चपर्यंत संध्या. 7 ते सकाळ 6 वाजेपर्यंत संचारबंदी
- नाना पटोले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार?, ‘या’ मंत्र्याचा होणार पत्ता कट
- थर्ड अंपायर कडून आणखी एक मोठी चूक; भारतीय संघाला भोगावे लागू शकतात वाईट परिणाम !
- मराठा आरक्षण : राज्याचा अधिकार काढून घेतलेला नाही;केंद्राचे न्यायालयात स्पष्टीकरण
- शिवसेनेतील आयारामांना पक्षाची शिस्त काय माहित, खैरेंचा सत्तारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
