Share

एमबीए आणि तेही क्रिकेटमध्ये? ऑस्ट्रेलीया क्रिकेटने सादर केली संकल्पना

Published On: 

मुंबई : भारतात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. क्रिकेटमध्ये भारताने विजय मिळवला की संपुर्ण देश तो विजय साजरा करतो. मात्र क्रिकेटकडे खेळ आणि मनोरंजन याव्यतीरिक्त दुसऱ्या दृष्टीकोनातुन सहसा भारतीय बघत नाही. मात्र एमबीए सारख्या अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश करावा अशी संकल्पना ऑस्ट्रेलीयन क्रिकेट प्लोअर्स असोसिएशनने पुढे आणली आहे.

एमबीएच्या अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश हा अश्चर्यकारक निर्णय ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सने घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे या विद्यापीठात क्रिकेट एमबीएच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे. या अभ्यासक्रमात आयपीएलच्या आयोजनातील बारकावे, त्यासाठीची वापरली जात असलेली कार्यपद्धतीचा समावेश यात केलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अस्तीत्वात असलेल्या क्रिकेट मंडळाच्या प्रशासनावर युवा खेळाडू अभ्यासकांचा समावेश व्हावा, याच उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.

ही संकल्पना ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर्स असोसिएशनने सुचवल्यानंतर ऑस्ट्रेलियातील नामांकित विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय घेतला. त्यामुळे क्रिकेटमध्ये एमबीए करणारे विद्यार्थी हे प्रात्यक्षिकासाठी म्हणून भारत दाैरा करतील. तीन वर्षांची कालावधी असलेल्या या पदवीमध्ये स्पोर्टस गव्हर्नन्स, मार्केटिंग, फॅन एंगेजमेंट, मीडिया, स्पोर्टस लॉ आणि इव्हेंटबाबत शिकवले जाईल. या अभ्यासक्रमासाठी एक लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (५६ लाख) प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!