Share

चीनच्या साठेबाजीमुळे भारतात मास्क आणि पीपीईची कमतरता, अमेरिकेच्या अधिकाऱ्याने केला खुलासा

Published On: 

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेकडून आता चीनबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जगावर आलेल्या संकटातही चीन मास्क आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणांची (पीपीई) मोठ्या प्रमाणात साठवणूक करत आहे.

चीनने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात 18 पट अधिक मास्क व वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) मागवल्याचा पुरावा अमेरिकेकडे असल्याचा दावा व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिका-याने केला आहे.

व्हाईट हाऊस ऑफ ट्रेड अँड प्रोडक्शनचे संचालक पीटर नावारो यांनी सोमवारी आरोप केला की, भारत आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुरेशी पीपीई नाहीत. मात्र चीन या परिस्थितीत मोठी साठेबाजी करत आहे. मास्क आणि पीपीईची साठवणूक करून गरीब देशांना महागड्या दारात विकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, व्हायरस विषयी माहिती लपवताना चीनने जगभरातील सर्व वैयक्तिक संरक्षक उपकरणे साठवली आहेत. माझ्याकडे थेट चीन सरकारच्या कस्टम युनियनकडून आलेले पुरावे आहेत. जे हे दाखवतात की, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात चीनने 18 पट अधिक मास्क खरेदी केले आहेत. तरी देखील त्यांच्याकडे दोन अब्जाहून अधिक मास्क होते. त्यामुळे याचे परिणाम भारत आणि ब्राझीलला भोगावे लागत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI&t=4s

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!