टीम महाराष्ट्र देश: टॅनिंग दूर करण्यासाठी अनेक लोक ब्लीचचा वापर करतात, पार्लरमध्ये जाऊन एकदा ब्लीच किंवा डि-टॅन फेशियल करण्यासाठी 300 रूपयांपेक्षा जास्त खर्च होतो. तसेच केमिकल ब्युटी प्रॉडक्ट वापरल्याने त्वचेवर दुष्परिणाम देखील होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही घरगुती फेसमास्क सांगणार आहोत. या फेस मास्कचा वापर केल्याने तुमची त्वचा डि-टॅन तर होईलच पण त्याबरोबर त्वचेचा टोन देखील सुधारेल.
कोरफड
कोरफडीमध्ये जीवनसत्त्वे A, C, E, B1, B2, B3 आणि B6 असतात. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील असते. डि-टॅन फेस मास्क बनवण्यासाठी, झोपण्यापूर्वी त्वचेवर कोरफडीचा ताजा गर लावा आणि हा गर रात्रभर चेहऱ्यावर राहू द्या. सकाळी धूवून टाका. चांगल्या परिणामांसाठी हे दररोज करा.
मध
मधामध्ये कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि अमिनो अॅसिड देखील असतात. मध वापरण्यासाठी दोन चमचे दह्यामध्ये एक चमचा मध मिसळा. ते चांगले मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. आता कोमट पाण्याने चेहरा धुवा. चांगल्या परिणामांसाठी हे दररोज करा.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये A आणि C व्हिटॅमिन असते. याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर आणि नियासिन यांसारखे पोषक घटकही टोमॅटोमध्ये आढळतात. फेसमास्क यतार करण्यासाठी टोमॅटो मॅश करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा हा फेसमास्क वापरा. हा मास्क त्वचेवरील टॅनिंग काढून टाकेल आणि त्वचा उजळ आणि चमकदार बनवेल.
बेसन
यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. याचे सेवन केल्याने तुम्हाला पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, लोह, कॅल्शियम, सोडियम, फायबर, जस्त, तांबे यांसारखे पोषक तत्व मिळतात. बेसनाचा फेस मास्क बनवण्यासाठी थोड्या बेसन पिठात चिमूटभर हळद, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस मिसळा. हे सर्व चांगले मिसळा आणि चेहऱ्याला लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हे आठवड्यातून दोनदा करा.
वरीलपैकी कोणताही एक उपाय तुम्ही नियमीतपणे केल्यास, तुम्हाला अधिक चांगला परिणाम दिसेल. तसेच तुमची त्वचा उन्हामुळे होणाऱ्या टॅनिंगपासूनही वाचेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

