Share

तब्बल इतक्या वर्षांनंतर भारताची हरनाझ संधू बनली ‘मिस युनिवर्स २०२१’

Published On: 

मुंबई : इस्रायल (Israel) मधील इलात येथे झालेल्या ७० व्या मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये भारताने क्राउन (Crown) जिंकलं आहे. हरनाझ संधूने (Harnaz Sandhu) पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका (Paraguay and South Africa) या स्पर्धकांना मागे टाकून मुकुट जिंकला. जागतिक स्तरावर थेट प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात संधूला मेक्सिकोच्या माजी मिस युनिव्हर्स २०२० च्या अँड्रिया मेझा यांनी मुकुट प्रदान केला. हा क्षण हरनाझ संधूसह सर्वांना भावूक करणारा ठरला होता. प्रथम आणि द्वितीय उपविजेते अनुक्रमे पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका होते.

https://twitter.com/MissUniverse/status/1470227063789563907?s=20

हा सोहळा डोळयाचे पारणे फेडणारा ठरला. यापूर्वी भारताकडून २००० मध्ये लारा दत्ताने (Lara Dutta ) विजेतेपद जिंकला होता. मात्र आता तब्बल २१ वर्षांनी भारताने हा ताज पटकावला असून संपूर्ण भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण ठरला आहे. पहिल्या तीन फेरीचा एक भाग म्हणून, स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आला होते की, तरुण महिलांना आजच्या काळात येणाऱ्या दबावांना कसे सामोरे गेले पाहिजे, याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल? यावर हरनाझ म्हणाली, ‘आजच्या तरुणाईला सर्वात मोठा दबाव म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. आपण अद्वितीय आहात हे जाणून घेणे आपल्याला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोला. बाहेर या, स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तू तुझाच आवाज आहेस. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि म्हणूनच मी आज इथे उभा आहे.’ असे ती म्हणाली. तिच्या दमदार उत्तरानंतर सौंदर्याने टॉप ३ मध्ये स्थान मिळवले.

https://www.instagram.com/p/CXWwcYGq2Rs/?utm_source=ig_web_copy_link

हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर् करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे. हरनाझने 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेससह तिच्या सौंदर्य स्पर्धेच्या प्रवासाला सुरुवात केली. तिच्याकडे फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ सारखी अनेक स्पर्धा खिताब देखील आहेत. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आता तिने भारतासाठी ‘मिस युनिव्हर्स २०२१’ जिंकून मानाचा तुरा शिरपेचात रोवल्यामुळे तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

हरनाझ संधूचे काही फोटो पहा.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!