🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या (IND vs SA) तिसऱ्या दिवशी यजमान संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि भारताचा पहिला डाव 327 धावांवर आटोपला. केएल राहुलने (KL Rahul) संघाकडून सर्वाधिक १२२ धावांची खेळी केली, तर यजमानांकडून लुंगी एनगीडीने ६ बळी घेतले.
भारताने पहिल्या दिवशी 3 गड्यांच्या मोबदल्यात 272 धावा केल्या होत्या आणि दुसरा दिवस पावसामुळे वाहून गेला. मात्र, तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी खास झाली नाही आणि पहिल्या दिवसाच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये एकही धाव न जोडता १२२ धावा करून केएल राहुल रबाडाच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर नियमित विकेट पडण्याचे प्रकार सुरूच राहिले. अजिंक्य रहाणेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि 48 धावा करून एनगीडीने त्याला बाद केले. ऋषभ पंतही केवळ 8 धावांचे योगदान देऊ शकला. अशाप्रकारे भारताचा संपूर्ण डाव 105.3 षटकात 327 धावांवर आटोपला. आज भारताने अवघ्या 55 धावा जोडल्या आणि उर्वरित 7 विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीने 6 आणि कागिसो रबाडाने 3 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल


