🕒 1 min read
मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी फारशी चांगली नाही ठरली. दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानुने रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर भारताची पदकाची झोळी रिकामी झाली आहे. मात्र मंगळवारी एका पदकाची आशा निर्माण झाली आहे.
एकिकडे भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कॉमने विजयी सलामी देत पदकच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे भारताचीच दुसरी महिला बॉक्सर लव्हलीना बोरगोहेनने उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली आहे. यामुळे ती पदकापासून केवळ एक विजय दुर आहे. तेव्हा बोरगोहेनकडून भारताला एक पदक नक्की मिळेल अशी अपेक्षा क्रीडा रसिक करत आहे. पुढील फेरी गाठताच तिच्या खात्यात किमान कांस्य पदक निश्चीत होईल. लव्हलीना बोरगोहेन ही आसामची पहिली महिला बॉक्सर आहे.
Onwards! ????????
Power packed punching from Lovlina Borgohain lands her a last eight slot as she wins 3-2 against Nadine Apetz of #GER in the women's 69kg welterweight category! ???? #IND #Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion | @LovlinaBorgohai pic.twitter.com/Y9rserNmyR
— Olympic Khel (@OlympicKhel) July 27, 2021
महिला बॉक्सिंग स्पर्धेतील ६४-६९ किलो वजनी गटात लव्हलीना बोरगोहेने जर्मनीची बॉक्सर नादीने अँट्झचा ३-२ च्या फरकाने पराभूत केले. १२ वर्षाने मोठी असलेल्या नादीनेवर लव्हलीनाने पहिल्या दोन फेरीत वर्चस्व कायम ठेवले. मात्र तिसऱ्या फेरीत नादीनेने जोरदार प्रतिकार केला मात्र अखेर लव्हलीनानेच बाजी मारत सामना आपल्या नावे करत उपांत्यपूर्व फेरीत पोहचली.
पहिलाच ऑलिम्पिक सामना खेळणाऱ्या लव्हलीनाचा हा विजय तिला खुप मोठा आत्मविश्वास देऊन जाईल. आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर ती भारतासाठी पदकाची कमाई करेल असे क्रीडा रसिकांना वाटत आहे. यापुर्वी जागतीक आणि आशीयाई स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या लव्हलीना बोरगोहेनला आता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची नामी संधी आहे. तिचा आगामी सामना ३० जुलै रोजी चायनाच्या तैपाईस नेईन चिं चैन शी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांची झुंबड
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
