Share

भारतीय महिला क्रिकेट संघाकडून शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलँडचा पराभव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: न्यूझीलँड विरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आखिरकार भारताला विजय मिळवला आहे. मालिकेतील ४ सामने गमावत भारतीय संघ क्लीन स्वीप होण्याच्या दारावर असताना हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकीय खेळीने भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला आहे. न्यूझीलँडने मालिका ४-१ जरी जिंकली असली तरी एक सामना जिंकून भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे.

प्रथम फलंदाजी करत न्यूझीलँडच्या संघाने ५० ओव्हरमध्ये २५१ धावा केल्या. न्यूझीलँडच्या अमेलिया केरने ६६ धावांची अर्धशतकीय खेळी केली. तर भारतीय गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत राजेश्वरी गायकवाड , स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा या तिघींना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. हरमनप्रीतच्या ६६ चेंडूत ६३ आणि स्मृती मंधानाच्या ८४ चेंडूत ७१ धावांच्या बळावर भारताने ४६ षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार मिताली राज ६६ चेंडूत ५७ धावा करून नाबाद राहिली.

T20 आणि पहिले चार एकदिवसीय सामने गमावल्यानंतर, पुढील महिन्यात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकात काही गती मिळविण्यासाठी भारताला विजयाची नितांत गरज होती. या विजयामुळे भारतीय संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे. क्वारंटाईनमध्ये राहिल्यामुळे पहिले तीन एकदिवसीय आणि टी-20 खेळू न शकलेली स्टार फलंदाज मंधानाने चांगली कामगिरी केली. भारतीय संघाला वर्ल्डकपचे जेतेपद मिळवण्यासाठी आव्हान द्यायचे असेल तर त्यांना केलेल्या कामगिरीत सातत्य ठेवणे आवश्यक असेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!